या केंद्राच्या माध्यमातून डॉ विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र , येथे पात्र जेष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तीसाठी दररोज मोफत सहायक साधने / उपकरणे देण्यात येतात. या सर्व व्यक्तींची तज्ञाच्यामार्फत तपासणी करण्यात येऊन , आधार कार्ड , उत्पन्नाचा दाखला व दिव्यांग व्यक्तींसाठी वैश्विक कार्ड (UDID) यांच्या आधारे साहित्य देण्यात येते.
आजच सदस्यता घ्या आणि प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र योजनेचा फायदा घ्या - सहाय साधने, प्रशिक्षण आणि अधिक!
देशातील पात्र जेष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तीसाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या महत्वकांक्षी "प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र" योजनेच्या माध्यमातून शारीरिक अक्षमतेनुसार दररोज मोफत सहायक साधने / उपकरणे आपल्या अहिल्यानगर मध्ये वाटप.
अ) श्रवणयंत्र, आ) व्हीलचेअर, इ) कमोडसहित व्हीलचेअर,
ई) कमोड चेअर, उ) सिलिकॉन कुशन, ऊ) गुडघ्याचा पट्टा,
ए) पाठीचा पट्टा, ऐ) मानेचा पट्टा, ओ) साधी काठी, औ) शीटसहित काठी, अं) तीन व चार पायाची काठी, अः) एल्बो क्रच, क) कुबडी (लहान / मध्यम / मोठी साईज), ख) वॉकर
अ) तीनचाकी सायकल, आ) बॅटरीवर चालणारी तीनचाकी सायकल (फक्त ८०% पेक्षा जास्त असलेल्या अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांगांसाठी), इ) व्हीलचेअर, ई) सीपी व्हीलचेअर कमोडसहित, उ) कुबडी (लहान / मध्यम / मोठी साईज), ऊ) साधी काठी, ए) वॉकर, ऐ) श्रवणयंत्र, ओ) मोबाईल फोन (अंधासाठी), औ) अंधकाठी, अं) ए डी एल किट, अः) सुगम्य केन, क) ब्रेल किट, ख) टी एल एम किट
अ) आधार कार्ड (६० वर्ष किंवा त्या पेक्षा जास्त वय)
ब) उत्पन्नाचा दाखला (१.८० पेक्षा कमी) (तलाठी / ग्रामसेवक / तहसीलदार / खासदार / नगरसेवक)
अ) वैश्विक कार्ड (UDID Card) (४०% दिव्यांगता किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगता)
ब) आधार कार्ड
क) उत्पन्नाचा दाखला (२.७० पेक्षा कमी) (तलाठी / ग्रामसेवक / तहसीलदार / खासदार / नगरसेवक)
१. वयोश्री योजना :- (६० वर्ष किंवा त्या पेक्षा जास्त वय):- राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत मागील ३ वर्षांमध्ये भारत सरकार / राज्य सरकार किंवा शासकीय / अशासकीय संस्था मार्फत कोणत्याही प्रकारचे साहित्य घेतलेले नसावे.
२. दिव्यांग योजना :- एडीप योजने अंतर्गत मागील ३ वर्ष किंवा ५ वर्षांमध्ये दिव्यांग व्यक्तीने (तीनचाकी मोटारचलित सायकल फक्त ८०% पेक्षा जास्त असलेल्या अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांगांसाठी व स्मार्ट मोबाईल फोन) भारत सरकार / राज्य सरकार किंवा शासकीय / अशासकीय संस्था मार्फत वरील साहित्य घेतलेले नसावे.
५. साहित्य व योजने विषयी माहितीसाठी संपर्क व पत्ता डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व प्रधानमंत्री दिव्यांग केंद्र, विळद घाट, अहिल्यानगर – ४१४१११. संपर्क क्रमांक:- ९५२९५१८८४० / ०२१४ २७७७७७२ Ex. ३३५
६. आपण आपली योजनेची पात्रता स्वतः बघू शकता. https://adip.depwd.gov.in/BeneficiarySearch